Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra Form PDF Download in Marathi

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF is now available to download in marathi language, get direct link to download 2 page form here. Under Ladki Bahin Yojana 2024, Maharashtra government will provide Rs. 1500 per month to women beneficiaries (ladli behna) in the age group of 21 to 65 years. Read this article till the end to know how to download Mazi Ladki Bahin Yojana hamipatra form PDF, what is the eligibility criteria, list of documents required and other aspects regarding the scheme in Marathi.

Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे. Direct link to download Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF – https://cdn.s3waas.gov.in/s345fbc6d3e05ebd93369ce542e8f2322d/uploads/2024/07/2024070499.pdf

Upon clicking the link, Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra Form PDF in Marathi will appear as shown below:-

Ladki Bahin Yojana Form Page 1

Ladki Bahin Yojana Hamipatra Form Page 2

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे)
  • अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.
  • वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक
    • पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
    • शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • नवविवाहितेच्या बाबतीत रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
  • बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)
  • लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उदिदष्ट

  • राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
  • त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  • राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
  • राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तिकरणास चालना देणे.
  • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरुप

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या सक्षम बैंक खात्यात DBT द्वारे दरमहा रु. १५००/- इतकी रक्कम दिली जाईल.

Also Read: How to Track Ladki Bahin Yojana Payment Status

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्रता

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अपात्रता

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी महिला हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक: १८१

Official Website: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Leave a Comment

Exit mobile version